जेव्हा आपन आईच्या पोटातून बाहेर येतो तेव्हा आईच्या चेहऱ्यावर एक वेगळच दुःख असतं ते दुःख फक्त त्या आईचं बाळच कुशीमध्ये बदलू शकतं बाकी कोणीच नाही...
त्या छोट्या बाळाची एक वेगळीच भाषा असते जी मोठ्या माणसांनी बोलून आपल्या आईला आनंद देता येत नाही. त्या बाळाची भाषा म्हणजेच ते फक्त रडूनच.. हे म्हणजेच छोट्या बाळाची टेक्निक हे रडणे आईला दुःख पोहोचत नाही परंतु आईच्या चेहऱ्यावर एक सुंदरशी स्माईल घेऊन येतं...
आपलं हे आयुष्य आपल्याला सुखाने मिळालय त्याचा चांगलाच वापर करा....
आपलं आयुष्य हे कोऱ्या पुस्तका सारखं अस्त पण जसं पुस्तक संपतं तसंच आपलं आयुष्य 📓पण कधीतरी संपूनच जातं...📖
आपण असं जगावं कि पूर्ण जगाला आपलं आयुष्य कळावं...असे भरपूर मनुष्य आहेत जे आपल्याला जीवनात खूप मोठी काम करतात पण ते प्रसिद्ध नाहीत.. मग, ह्या मोठेपणाचा पण काय उपयोग राहत नाही. म्हणजेच आपण आपल्या आयुष्यात एकच असं काम करावं की संपूर्ण जग आपल्याला त्या कामाने ओळखावं...
आपल्याला आयुष्य नशिबानी मिळालंय... त्याला सांभाळायला खूप अवघड आहे पण, वापरायला अगदीच सोप्प...
भारतात 'सुसाईड' म्हणजेच आत्महत्या, हा शब्द खूप प्रसिद्ध आहे कारण की कित्येक लोकांनी आत्महत्या केलेली आहे.. जास्त करून शेतकरी ...शेतकऱ्यांच कसं ..,त्यांची जमीन गेली तर सुसाईड, काम नाही मिळालं तर सुसाईड, स्वतःची अपमानि झाली तर सुसाईड, घरात भांडण झालं तर सुसाईड, बास.... आजून किती करणार सुसाईड, आता हे सगळं थांबवा कारण तुमचं आयुष्य खेळ नाही, ज्या आईने तुम्हाला जन्म दिला तिचा तरी थोडा विचार करा... ह्याच क्षणा साठी तुम्हाला जन्म दिला होता? नाही ना.. मग थोडा विचार करा ...सुसाईड ही एक अशी शिक्षा आहे जी आपण स्वतःला देतो पण त्याची माफी आपल्याला कधीच भेटत नाही.
सुसाईड करायच्या आधी दहा वेळा नाहीतर हजार वेळा विचार करा किंतु तुम्हाला परत हेच जीवन मिळेल का? मग तुमच्या आई- बाबांच काय? तुम्ही कमवलेल्या मित्रांच काय? हेचा विचार करा...
सुसाईड करणे हाच एक उपाय नाही जे तुम्हाला कठीण परिस्थिती पासून दूर करू शकतं..
पण माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की एकदा आयुष्य मिळाल्यावर त्या आयुष्याच्या परिस्थिती जो सांभाळायला शिकेलना त्याचच खरं आयुष्य...
!!..म्हणूनच म्हणतात आयुष्य हे मरण्यासाठी नाही परंतु जगण्यासाठीच...!!
धन्यवाद !
Khup Sundar vichar👌
ReplyDeleteKeep it up
Soo deep.. nice.. 👍
ReplyDeleteThks alot....!!
DeleteLovely💕👍🏻
ReplyDeleteThank u...!!
Delete